उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
15

जत(जि.सांगली) ,दि.31-जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी )केंद्र आसंगीतुर्क ता.जत जिल्हा सांगली येथे ७ वर्षा पासून कार्यरत असलेले सह शिक्षक दिलीप वाघमारे यांना लायन्स व लायनेस क्लब जत च्या वतीने रविवार (दि.२९)ला लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या मान्यवराचा लायन्स व लायनेस क्लब जत च्या वतीने प्रती वर्षी सत्कार करण्यात येतो. त्याच अनुषंगाने यंदाचे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच सपन्न झाला .

सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्ल उमा नर्सिग कॉलेज विजापूर रोड जत जि.सांगली येथे आमदार अनिल बाबर विटा, आमदार विलासराव जगताप,वासुदेव कलगटगी,प्रा.एन.ए. इनामदार व डॉ .रविंद् आरळी, राजेंद् आरळी, सचिन संख अध्यक्ष ,चिदानंद कल्याणी, मनोहर पवार,माळी सर,कोळी सरआदी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मनोहर पवार,संतोष काटे,मल्लेशप्पा कांबळे,ऐनापूरे सर, दिगंबर सांवत,संदीप कांबळे,हुवाळे केरप्पा,कट्टीमणी सर,हुवाळे प्रल्हाद,दिपक कोळी सर,राजू माळी सर, व सहकारी शिक्षक व मिञ परिवार उपस्थित होते.

या मध्ये सध्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती पांडोझरी ७ वर्ष पासून कार्यरत असलेले सहशिक्षक दिलीप वाघमारे यांची लायन्स आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, वाघमारे सर याची थोडक्यात माहीती .शैक्षणिक व सामाजिक कार्य करतात व या बरोबर च त्याचे साहीत्य लेखनात हातखंडा आहे.त्याचे अनेक विशेषांक व मासिक अंकात कविता प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र राज्य मागासर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक म्हणून कार्य करतात तर गायनाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे सामाजिक कार्य मौलिक कार्य करीत आहेत.कायम दुष्काळी तालूक्यात टँकरने वाडी वस्तीवर पाणी पुरवठा असते, त्या परिस्थितीत शाळेत हिरवाई कायम ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टीत सलग दोन वृक्ष संगोपन हा उपक्रम सर्व विद्यार्थी व पालक व नागरिक याची साथ घेवून उपक्रम यशस्वी केले. ज्ञान ज्योती सावित्रीबाईफुले विशेषांक २०१७ संपादन केले.शाळेत बोलक्या भिंतीची शाळा म्हणून नाव रुपाला येत आहे.शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमामुळे उपक्रमशील शिक्षक म्हणून कौतुक करण्यात आले.