भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू

0
12

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा करुन चर्चेत आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एका व्हिडिओमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवराजसिंह यांच्याभोवती लोकांनी गराडा घातला असून या गर्दीतील खास व्यक्तीला त्यांनी फ्लाइंग किस दिला आणि सगळ्यांनाच चकित केले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा हा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील अशोक नगरमधील मुंगावली या गावातील एका कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.या व्हिडिओत शिवराजसिंह यांच्याभोवती लोकांची गर्दी जमली आहे. काही लोक त्यांना चिठ्ठ्या देताहेत. या गर्दीतील एक व्यक्ती शिवराज यांना मामाजी असा आवाज देत आहे. शिवराज यांनी पाहिल्यानंतर ती व्यक्ती त्यांना आय लव्ह यू म्हणते. त्यावर शिवराजही लव्ह यू म्हणतात आणि फ्लाइंग किस देतात. त्यानंतर ते खळखळून हसायला लागले, असे या व्हिडिओत दिसते.