जिल्हा उपनिबंधकांना भेटले गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपचे सदस्य

0
13
गोंदिया,दि.३१- गोंदिया शहरासह जिल्ह्यातील विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या गोंदिया विधानसभा व्हाटसअप या सोशल मिडीयाच्या सदस्यांनी आज मंगळवारला शेतकरी कर्जमाफीचा विषय घेत जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांची भेट घेतली.या भेटीच्यावेळी गोंदिया विधानसभा सोशलमिडिया गृपच्या सदस्यांनी एक लेखी निवेदन सादर केले.त्या निवेदनात शेतकèयांना जी कर्जमाफी दिली जात आहे,ती सहकारी संस्थाद्वारे दिली जाणार राष्ट्रीयकृत बँकाद्वारे दिली जाणार यासबंधी शासनाची भूमिका स्पष्ट करण्यात यावे.कर्जमाफी ही शेतकèयांना घेतलेल्या कर्जरक्कमेवर देण्यात येणार की प्रती एकरी टक्केवारीने देण्यात येणार.ऑनलाईन अर्ज केलेले व न केलेल्या शेतकèयांचा आकड्यातील अंतर किती आहे.त्यासोबतच ज्यांनी कर्ज घेतलेले आहे,परंतु ऑनलाईन अर्ज भरू शकले नाही त्यांना शासन काय मदत करणार आहे.कर्जमाफीमध्ये नाव असलेल्या शेतकèयांची यादी ग्रामसेवक व तलाठ्यांना देण्यात आली काय आदीबाबींचा उल्लेख करण्यात आला होता.निवेदन देत चर्चेच्यावेळी अजय जैस्वाल,प्रतीक कदम,दुर्गेश रहागंडाले,राजीव ठकरेले,नीलेश देशभ्रतार,रौनक ठाकुर,शैलू हुड,जीतू लिल्हारे,हर्षल पवार आदी उपस्थित होते.या सर्वांना जिल्हा उपनिबंधक जाधव यांनी सविस्तर माहिती देत जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली.