…अन तिने दिला आरोग्य उपकेंद्राच्या दरवाज्यावरच मुलीला जन्म

0
20

आलापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) : जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवा नेहमीच या ना त्या कारणाने ढेपाळली असल्याचे दिसून येत असते. आरोग्य सुविधेच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आल्लापल्ली येथील आरोग्य उपकेंद्राच्या आवारात घडला. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका व कर्मचारी नसल्याने आरोग्य उपकेंद्राच्या दरवाज्यावरच मुलीला जन्म देण्याची वेळ आली.
आल्लापल्ली येथील मन्नेवार कॉलोनीत राहणारे राजू मडावी ह्यांची पत्नी पंडरी मडावी ही गरोदर होती. तिला २९ आँक्टो ला सकाळीच प्रसुतीवेदना सुरु झाल्यामुळे तीच्या सासूने व आजुबाजुला महिलांनी आल्लापल्ली येथील सावरकर चौकात असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आणले. मात्र सकाळच्या सुमारास उपकेंद्रात प्रसूती करण्यासाठी कोणीही अरोग्यसेविका हजर नव्हत्या दरम्यान पंडरीला प्रसूती कळा असह्य झाल्या होत्या. त्यावेळी नजीकच्या असलेल्या तृप्ती खोब्रागडे व तीची आई तोडसाम व इतर महिलांनी धाव घेऊन सीनेमात शोभेल त्याप्रमाणे गरोदर महिलेच्या भोवती कपडे बांधून त्या महिलेची प्रसुती करुन घेतली. बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत.
आल्लापल्ली येथील आरोग्य उपकेंद्रात ३ आरोग्यसेविकेची पोस्ट आहेत. त्यापैकी २ अरोग्यसेविका नियमित आहेत तर १ अरोग्यसेविका कंत्राटी आहेत. त्यापैकी १ अरोग्यसेविका २९ आँक्टो (रविवारी) सुट्टीवर होत्या. बाकी २ अरोग्यसेविका रविवार असल्याने घरी होत्या. त्यामुळे गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य उपकेंद्रात येणार आहे. याची माहिती नव्हती. अशी प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्का उईके यांनी दिली.
ही बाब कळताच आज सकाळच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते आल्ल्लापल्ली ग्रा.प. सदस्य रविन्द्र मुप्पीडवार यांनी पंडरी मडावीच्या घरी जाऊन तीला आर्थिक मदत केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी अल्का उईके व व आरोग्य सेविका जुमनाके या आधीपासुनच बाळ व बाळंतीणीची आरोग्य तपासणी करीत होते. बाळंतीणीला बाळाची काळजी घेणाच्या आवश्यक सुचना देत होते त्यामुळे यापुढे कोणत्याही महिलेला रस्त्यावर बाळाला जन्म देण्याची वेळ येऊ नये म्हणजे पावले. हीच आरोग्य विभागाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.