सिरोंचाच्या मुलींनी मुंबईला पराभूत करीत राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धड़क

0
39

आल्लापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) -गडचिरोली हा अतिदुर्गम,विकासा पासून वंचित ,सोई-सुविधा पासून वंचित असलेला जिल्हा अशी ओळख आहे.मात्र जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंच्या अदम्य आशावाद व् मेहनंतीच्या जोरावर जिल्हाचे नाव रोशन करीत असतात.
महाराष्ट्रा च्या एका टोकाला असलेेल्या सिरोंचा येथील  जिल्हा परिषद हाइस्कूल च्या मुलिंनी मुम्बई येथील भारतरत्न राजीव गांधी क्रीड़ा संकुल ,धारावी क्रीड़ा व् युवक सेवा संचानालय तर्फे सुरु  असलेल्या कब्बडी स्पर्धेत होम टीम मुंबई ला16 अंकानी हरवित सेमीफाइनल मधे दिमाखात प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे मुम्बई ला त्यांच्याच होम पिच वर धुल चारणारी सिरोंचा ही पहिली टीम आहे.उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा उपांत्य फेरिचा सामना औरंगाबाद सोबत होणार आहे.
सिरोंचा च्या मुलीं नी अत्यंत बिकट स्थितीत या स्पर्धेची तैयारी केलि आहे.जिल्हा परिषद हाइस्कूल येथे गेल्या 10 वर्षापासून स्पोर्ट्स टीचर नाही,मानधन वरील शिक्षकानि केलेल्या अथक परिश्रमातुण मुलींनि राज्यस्तरीय स्पर्धेची तैयारी केली आहे. सरकार कडून शाळेला स्पर्धे साठी कोणतेही अनुदान मिळाले नाही.शिक्षकानी वर्गनी गोळा करुण  मुलींना स्पर्धेसाठी मुंबई ला पाठविले आहे.या स्पर्धेसाठी  शाळेचे शिक्षक श्याम मादेशी, वंजारी,सोनकर  यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यासोबतच सिरोंच्या पोलिस विभागाचे राज्य स्तरीय कब्बडीचे खेळाडू राहिलेले  पोलिस गायकवाड़,पोलिस उप निरीक्षक पाटिल यांनी रोज त्यांना मार्गर्दर्शन करीत होते.सिरोंच्या पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुपे यांनी मुलींना स्पोर्ट्स किट देऊन मुलींचा आत्मविश्वास वाढविला .त्यामुळे मुलीं नि त्यांचा विश्वास सार्थ ठरवित जिद्दिनी 8 संघ भाग घेत असलेल्या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिलविला आहे