शनिवारी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
9

गोंदिया,दि. 3 : बदली धोरण आणि शिक्षकविरोधी धोरणाच्या विरोधात ४ नोव्हेंबर रोजी शिक्षक कृती महासंघ गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत.
राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण व शिक्षकविरोधी धोरण राबविले जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शिक्षकाच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामात गुंतवून जिल्हा परिषद शाळा बंद व्हाव्यात, असे धोरण आखल्या जात आहे. या वर्षात वर्षभर बदलीचे धोरण सुरू ठेवून शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण केल्या जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे.
तेव्हा शिक्षकांवर केल्या जात असलेल्या अन्यायाविरोधात व अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी, २३ ऑक्टोबर २0१७ चा वरिष्ठ श्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी लागून करण्याबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा, मुख्याध्यापक व शिक्षकांचे ऑनलाईन काम बंद करून स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, २७ फेब्रुवारी २0१७ च्या बदली धोरणात बदल करून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे, एमएससीआयटीची वसूली कायस्वरुपी बंद करण्यात यावी, शालेय पोषण आहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, निधीची व्यवस्था नियमित करण्यात यावी, अशा मागण्या प्रलंबीत आहेत.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेव्हा आयोजित मोर्चात जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विरेंद्र कटरे,नुतन बांगरे,एल.यु.खोबॅ्ागडे, नानन बिसेन, एल. एफ. गिर्‍हेपुंजे, मनोज दीक्षित, यशवंत परशुरामकर, व्ही.डी. मेश्राम, रेशीम कापगते, देशराज रहांगडाले, जितेंद्र बरडे, विनोद जांभुळकर, महेंद्र सोनवाने, प्राजक्ता रणदिवे, जी. टी. भोयर, एन.आर. ठाकरे, ओ.वाय. डहाके, बी.एफ. बालपांडे, आशिष रामटेके,अय्युब मेमन,अनिरुध्द मेश्राम,गणेश चुटे,किशोर डोंगरवार,केदार गोटेफोडे व इतरांनी केले