भंडारा येथे दिवाळी अंक प्रदर्शनीचे आयोजन

0
9

भंडारा,दि.10ः भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडाराच्यावतीने आज शुक्रवार(दि.10) ला दिवाळी अंक प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य पाखमाडे होते तर महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल दुर्गाप्रसाद चौधरी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, व्हीएमव्ही चॅनलचे संचालक प्रमोद भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले तर आभार संजय नारनवरे यांनी मानले.संचालन कु. प्रीती या विद्याथिर्नीने केले.