मोहाडी तालुक्याला ‘जलयुक्त’चे जिल्हास्तरीय तीन पुरस्कार

0
17

भंडारा,दि.14 : जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी तालुक्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वाेत्तम राहिली. परिणाम म्हणून तालुक्याला एकाचवेळी जिल्हास्तरीय तीन पुरस्कार अनुक्रमे प्रथम पिंपळगाव, द्वितीय करडी व तृतीय पुरस्कार नरसिंगटोला देव्हाडा गावांना मिळाला. मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. अधिकारी, सरपंच व ग्रामपदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तालुक्याच्या शिरपेचात माणाचा तुरा या पुरस्काराने रोवला गेला.
मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना लोक चळवळ झाली असून या योजनेतून मोठ्या प्रमाणात जलसाठ्यांचे पुनर्जीवन, बांधणी व साठवणे कामे करण्यात आली. पावसाचे प्रमाण कमी असतानाही जलयुक्त शिवार योजनेत अडविलेल्या साठविलेल्या पावसाच्या पाण्याच्या भरस्यावर शेतकºयांना भरघोष उत्पादन घेता आले. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात भर पडली. शिवाय पाण्याचा कामयचा स्त्रोत निर्माण झाला. मोहाडी तालुक्यात कृषी विभागाने मेहनत घेत मोठी कामे केली. अन्य विभागाने सुद्धा शासनाच्या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे शेतकºयांतील निराशावादी विचारसरणी दूर होण्यास मदत झाली.पाण्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद ठेवण्याचे कसब शेतकºयांना आत्मसात करता आले. अन्य गावांना व शेतकºयांना यातून प्रेरणा मिळाली.
वर्धा येथे ९ नोव्हेंबर रोजी नागपूर विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात मोहाडी तालुक्याला जिल्हास्तराचे तीन पुरस्कार मिळाले. प्रथम पुरस्कार पिंपळगाव, द्वितीय करडी तर तृतीय पुरस्कार नरसिंगटोला देव्हाडा बुज गावांना मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते वितरीत करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पाथ्रीकर, मंडळ कृषी अधिकारी राहूल गायकवाड, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, अरुण सार्वे, कृषी सहायक यादोराव बारापात्रे, देवेंद्र वाडीभस्मे, करडीचे सरपंच सिमा साठवणे, नरसिंगटोलाचे सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, सदस्य दुर्याेधन बोंदरे, सियाराम साठवणे, पिंपळगावचे सरपंच विक्रम जिभकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त गावातील सरपंच, पदाधिकारी तसेच अधिकाºयांचे जिल्हाधिकारी यांनी कौतूक केले.