झाडीपट्टीतील कलावंताची शासन कधी दखल घेणार-राजेश बिसेन

0
22

गोंदिया,दि.३०-विदर्भातील जनजिवनाच्या सर्वांगीण विकासाकडे मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.त्यात आणखी भर म्हणजे येथील कलावंत आणि त्यांची कला याची सतत अवहेलना होत आहे.ही बाब अंत्यत खेदजनक आणि संतापजनक असल्याची टिका विदर्भातील गायक,संगितकार राजेश बिसेन यांनी केले आहे.
विदर्भ लोककला व लोकसंगीत विकास परिषद या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे ते संस्थापक असून या संस्थेचे सदस्य असलेल्या कलावंताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.वैदर्भिय कलेचा विकास आणि सन्मान यासाठी संघर्ष केल्याशिवाय अन्य पर्याय नाही अशा मानसिकतेने हे कलावंत विदर्भ लोककला व संगित परिषद या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत असल्याचे स्पष्ट आहे.झाडीपट्टीतील साहित्य,कला,संगीत,नाट्य पथके,कलावंताचा अभिनय,शाहिरी यांची दखल घेऊन नाट्य महोत्सवासारखे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला हवेत.यासाठी दुजाभाव न करता अनुदान शासनाने द्यायला हवे.सिनेमा काढण्याची शक्ती हिमंत या भागातील कलावंतामध्ये आहे,त्यासाठी आर्थिक बळ शासनाने पुरवायला हवे.येथील कलावंत गरीब आहेत.मात्र कलेच्या बाबातीत समृध्द आहेत.फक्त पुणे,मुंबई असा भेदभाव न करता झाडीपट्टी कलावंताचा सन्मान राज्य सरकार आणि सांस्कृतिक मंत्रालयाने करावा अशी मागणी राजेश बिसेन यांनी केली आहे.