मनसे तालुकाध्यक्षानी केली पोलीस संरक्षणाची मागणी

0
14
नांदेड दि.३०-:-  सगरोळी ता बिलोली जि.नांदेड हे तालुक्यातील ठिकाण आपल्या शैक्षणिक कामगिरीमुळे राज्यभरात नावारुपास आलेले गाव आता बड्या घरचा पोकळ वासा ह्या म्हणीप्रमाणे  आपल्या गैरभारामुळे चर्चेत आले आहे.गेल्या अनेक वर्षापासुन ग्राम पंचायत सगरोळी व संस्कृती संवर्धन मंडळाच्या संस्थेतील गैरकारभारा विरोधात लढा देणारे व सततचा पाठपुरावा करणारे मनसे तालुकाध्यक्ष व बसव ब्रिगेडचे जिल्हा संघटक शंकर गंगाधर महाजन यांनी जिवीताचे संरक्षणासाठी पोलिस संरक्षणाची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे
सगरोळी ग्राम पंचायत अंतर्गत असणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाची 99 एकर जागेवर शाळा, वस्तीगृह ,कर्मचारी निवास, वाचनालय व कार्यालय मोठया प्रमाणात आहेत ज्याचा कर नियमानुरुप करण्यात यावा . सन 2004-05 साली वस्तीवाढीसाठी देण्यात आलेल्या जमिनीचे वाटप न करता संस्थाअंतर्गत उपयोग केल्याची जमीन घोटाळा  चौकशी करून मूळ लाभार्थ्याना वितरण करणे . जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 48 एकर तलावाच्या जमिनीवर झालेल्या व होत असलेल्या अतिक्रमणाची चौकशी करणे व काढणे . संस्थेच्या पश्चिमेस असलेल्या राखीव वन जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची चौकशी होऊन वन कायद्यांतर्गत झालेले प्राथमिक गुन्हा क्रमांक 1/2017 प्रकरण अशी भ्रष्टाचाराची व अनियमित कार्यशैलीची प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा केला व ही प्रकरणे सार्वजनिक करण्यात आली ज्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय आणि संस्कृती संवर्धन मंडळामागे चौकशीचा ससेमिरा लागला ह्याचा राग मनात धरून ग्राम पंचायतीचे उपसरपंच रोहित देशमुख आणि संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख हे माझी प्राणहानी करतील म्हणून शंकर महाजन यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्याकडे स्वतःच्या व परिवाराच्या संरक्षणासाठी निवेदन केले आहे
ग्राम पंचायतच्या 8 सदस्यांविरुद्ध कायदेशीर लढा देऊन अपात्र सिद्ध करणे ; निधी गैरव्यवहार उघड करणे ; शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण उघड करणे ; आदी बाबींमुळे सामान्य जणाच्या गळ्यातील ताईत बनलेले शंकर महाजन हे वर्चस्ववाद्यांच्या गळ्यात हाडुकासारखे अडकले ज्यामुळे सैरभैर होऊन शंकर महाजन यांच्यावरच खंडणीखोर म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार केली.निनावी नावाने जिवे मारण्याच्या सतत धमक्या आणि त्यांच्या गाडीवर करण्यात आलेली दगडफेक मुळे हतबल झाले परंतु तक्रार करूनही कार्यवाही करण्यात आली नाही .  धनशक्तीचा व  पदप्रतिष्ठेची युती होऊन माझा व माझ्या परिवाराचा घात करतील म्हणून पोलिस संरक्षणाची मागणी केली