केंद्रसरकारने प्रकाशित केली चुकीची उद्देशिकाःभारिप बहुजनमहासंघाचे निवेदन

0
20

गोंदिया,दि.30ः- देशात 26 नोव्हेंबर 2017 ला संविधान दिन साजरा करण्यात आले.या संविधान दिनाच्या निमित्ताने केंद्रसरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेली जाहिरात वर्तमान पत्रात प्रकाशित केली.त्या जाहिरातीसोबतच भारतीय संविधान मधील उद्देशिका प्रकाशित करण्यात आली होती. परंतु जी उद्देशिका प्रकाशित करण्यात आली,ती पुर्णत तोडून प्रकाशित करण्यात आली असून मुळ उद्देशिकेलाच बाजुला सारत देशवासियाच्या भावनांशी केंद्र सरकारने खेळण्याचा केलेल्या प्रयत्नाचा निषेध गोंदिया भारीप बहुजन महासंघाने निवेदनाच्या माध्यमातून नोंदविला आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना आज गुरुवारला निवेदन देत भारीप बहुजन महासंघाने निवेदनात उद्देशिका तोडमरोड करून चुकीची प्रकाशित करुन भारतीय लोकांच्या भावना दुखविण्यात आल्याचे म्हटले आहे. सदर निवेदन राष्ट्रपती यांच्या नावे सादर करण्यात आले.तसेच चुकीची उद्देशिका प्रकाशित करणार्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी भारिप-बहुजन महासंघाचे विनोदकुमार नंदुरकर,डॉ. डी बी डाहाट भारिप बहुजन महासंघ गोंदिया शहर अध्यक्ष, मनोहर शेंडे, रमेश रामटेके, साखरे सर, एड् रंगारी, गोवर्धन बन्सोड व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.