खैरलांजी,रोहीत वेमुल्ला ,आणि नितीन आगेच्या मारेकऱ्याना केंव्हा होणार फाशी-संविधान दुगाने

0
8
सदरील प्रकरणाची केस अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी लढवावी…!
नांदेड ( सय्यद रियाज ),दि.5- दीड वर्षापूर्वी घडलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरनातील आरोपीना फाशीची शिक्षा ठोटावण्यात आली मात्र बरीच वर्ष लोटुनही आजपर्यंत खैरलांजीतील पीड़ित भोतमांगे परिवाराला न्याय का मिळाला नाही?असा सवाल वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केला आहे.
       त्यात त्यांनी रोहित वेमूल्ला व नितीन आगे प्रकरणाचा ही प्रकर्षाने उल्लेख केला आहे.समता आणि न्याय भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची पायमल्ली करत भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायदानाची महत्वपूर्ण भूमिका बजावणारे शासकीय वकील जात पाहून केस लढवत असल्याचा घनाघाती आरोप दुगाने यांनी केला आहे.कारण खैरलांजी मध्ये एका स्त्रीच्या योनीमध्ये रॉड घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने तेथील जातीय गाव गुंडानी केला.तिच्याच आईची गावभर नागडी धिंड काढली गेली.तिच्या सोबत तिच्याच भावाने बलात्कार करावा अशी धमकी भावाला दिली गेली.त्यांनी ही मागणी ऐकली नाही म्हणून त्याचे गुप्तांग कापले गेले होते.हे सगळं घडत असताना त्या गावातील महिला टाळ्या वाजवत होत्या.हल्लेखोराना चेतवीत होत्या.हे सगळं घडून गेल्यावर इथल्या व्यवस्थेला जाग आली तोपर्यंत 4 जीव गेले होते. आणि एक जिव वेडा झाला होता.पण एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले.दिल्लीतील निर्भया उर्फ प्रियंका बलात्कार प्रकरनातील आरोपीना सुद्धा फाशी झाली.आणि काल-परवा कोपर्डि बलात्कार प्रकरणातील आरोपीना सुध्दा फाशीची शिक्षा सुणावण्यात आली.त्यातच नितीन आगे केसचा निकाल लागला ज्याचा खून झाला त्याच्या खुनातील तेरा आरोपीना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडले.त्याला वर्गातून मारत नेल गेलेल सगळ्या गावाने पाहिल होत.त्याच्या गुप्तांगात गरम सळया घालून अमानुष पणे त्याची हत्या केली गेली.पण तरी त्याचे मारेकरी मोकाटच का?कोपर्डिच्या आरोपीना केवळ परिस्थितीजन्य पुरावा ह्या एकाच आधारावर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतांना फाशी होतेय.नितीन आगे प्रकरणातील साक्षीदार उलटले असतीलही पण परिस्थितीजन्य पुरावा तर नितीन आगेच्या बाजूने होता व आहे.मग नितीनला न्याय का मिळाला नाही ?असा सवाल निवेदनाच्या माध्यमातून संविधान दुगाने यांनी केला आहे.
  खैरलांजी ची केस ज्या वकिलांनी लढवली त्याच वकिलांनी कोपर्डिच्या भगिनीला न्याय मिळवून दिला.तर खैरलांजी पीड़ित स्त्री ही स्त्री न्हवती का?तर मग न्याय जात पाहून दिलाय का?समतेच्या जगमान्य तत्वाला उज्वल निकम सारखे वकील मानत नसून ज्या संविधानातील तत्वाला हे वकील मानत नाही.हा घटनेचा अवमान असून देशाच्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवमान करणाऱ्या वकिलांना वकिली करण्याचा काहीच अधिकार नाही.
      सदरील,नितीन आगे,रोहीत वेमूल्ला व खैरलांजी प्रकरण भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकरांनी ही केस लढवून वरील पिडितांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची संधी न्यायालयाने अँड.आंबेडकरांना द्यावी.आणि भारतीय घटनेचा अवमान करून न्याय दाणात भेद करणाऱ्या अँड उज्वल निकम यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.