रास्तभाव दुकानांतून स्वस्त दराने तूरडाळ विक्रीचा शुभारंभ

0
12

मुंबई, दि. 5 : रास्तभाव दुकानांतून स्वस्त दराने तूरडाळ विक्रीबाबतचा
शुभारंभ आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अधिकृत
शिधावाटप दुकान क्र. 1-अ-100 कुलाबा येथे करण्यात आला.
शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन केलेल्या
तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानांमार्फत
वितरीत करण्यात येत आहे. मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी 972 मे.टन
तूरडाळ सर्व अधिकृत शिधावाटप दुकानांमार्फत विक्रीकरिता उपलब्ध करुन
देण्यात आली. प्रतिकिलो 55 रुपये दराने इच्छुक शिधापत्रिकाधारकांना ही
डाळ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यावेळी नियंत्रक शिधावाटप व उपनियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे तसेच आदी
लाभधारक उपस्थित होते.