ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी शासकीय जागेचे प्रस्ताव सादर करा

0
15

गोंदिया,दि.6 : जिल्हास्तरावर ओबीसींच्या मुला-मुलींसाठी नवीन शासकीय वस्तीगृह सुरु करुन त्याची देखभाल करण्यासाठी (विजाभज, इमाव व विमाप्र) ओबीसी मंत्रालयाच्यावतीने राज्यातील सर्व प्रादेशीक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना निर्देश देण्यात आले आहेत.
ओबीसी मंत्रालयाच्याावतीने ६ नोव्हेंंबर रोजी काढलेल्या पत्रात केंद्र शासनाच्या ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलीकरिता वस्तीगृह बांधकाम योजनेबाबत दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर हे वस्तीगृह सुरु करावयाचे आहेत. त्याकरिता ओबीसी मुला-मुलींचे नवीन वस्तीगृह निर्माण करुन त्याची देखभाल करण्याच्या अनुषंगाने तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातच केंद्रीय समाज कल्याण मंत्री थावरचंद गहलोत यांनी जाहिर केलेल्या नागपूर येथील ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या ओबीसी वस्तीगृहासाठी नागपूर जिल्ह्यताील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.सोबतच सर्व जिल्हाधिकारी यांनी ओबीसी विद्याथ्र्यांच्या वस्तीगृहासाठी शासकीय जागा उपलब्धतेबाबत चा सात बारा उताèयासह अहवाल सादर करावे असे निर्देश अव्वर सचिवांनी दिल्याने ओबीसी विद्याथ्र्यांच्या वस्तीगृहाचा मार्ग मोकळा झाला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हे वस्तीगृह सुरु होईल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.