बाबरी मस्जीद पाडल्याप्रकरणी बिलोलीत तहसीलसमोर धरणे

0
11
नांदेड ( सय्यद रियाज ),दि.6ः- बिलोली येथील तहसिल कार्यालयासमोर आज ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जीद पाडल्याप्रकरणी बिलोली शहरातील मुस्लिम बांधवानी आप आपली दुकाने  बंद ठेवुन काळा दिवस पाळला.सोबतच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत  तहसीलदार व  पोलीस निरिक्षकांना  निवेदन सादर केले. प्रदेशातील अयोध्या येथे मुस्लिम बांधवाच्या भावना दुखवुन मस्जिद पाडण्याचे काम भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जाणिवपुर्वक करुन तथाकथित समाजकंटकांनी महापाप केल्याचे मुस्लीम बांधवानी आंदोलनादरम्यान भावना व्यक्त केल्या.
त्या घटनेला निषेध म्हणून आज 6 डिसेंबला बुधवारी सकाळपासुनच  सर्व  मुस्लिम बांधवानी आपली सर्व दुकाने बंद ठेवुन काळा दिवस पाळला.यावेळी नायब  तहसिलदार ओमप्रकाश गौड व पोलीस निरिक्षक भगवान धबगडे यांना  निवेदन दिले. यावेळी मौलाना ईनामदार मिर्झा  अहेमद बेग,मौलाना मुबिन खान,मौलाना हाफिज मोहम्मद ,शेख सुलेमान,पत्रकार शेख फारुक अहेमद,ईनामदार मिर्झा शाहेद बेग,शेख युनुस बाबुमियाँ,मिर्झा अजीज  बेग,अमजद चाऊस,जावेद कुरेशी,साबेर पटेल,मुज्जु बेग ईनामदार,सय्यद रियाज़,गफार कुरेशी,फैसल पटेल,मिर्जा मन्सुर बेग,ईरशाद मौलाना,मुकरम फारुकी,रहीम कुरेशी,शाहेद पटेल सह शहरातील शेकडो मुस्लिम बांधव मोठयासंख्येने ऊपस्थित होते.