बिलोली तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – म.न.से

0
13
नांदेड (सय्यद रियाज ),दि.7ः-  बिलोली तालुक्यात यंदा पाउसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी झाल्याने तसेच कापसाचे पीक ऐन मोसमी  बहारात आसताना अवेळी झालेल्या  जोरदार परतीच्या पावसामुळे पीकावर रोगांचा व बोंड आळीचा   प्रादुर्भावा होंउन कापुस उत्पादनात मोठी घट झाल्याने या महाप्रलयकारी सततच्या  नैसर्गिक आसामानी संकटात सापडलेल्या तालुक्यातील  शेतक-याना दिलासा देण्यासाठी सरकारने  एकरी पंचविस हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसह इतर अन्य मागण्यानचे निवेदन मनसे च्या वतिने उपविभागिय अधिकारी बिलोली याच्याकडे दि.6 डिसेंबर रोजी देण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी झालेले  आसताना कापुस उत्पादक शेतकरी कसेबसे काठावरची कसरत करत पीक उत्पादक वाढिसाठी राञन-दिवस शर्तीचे प्रयत्न करीत आसताना ऐन पीक मोसमी बहारावर आसताना  परतीच्या पावसाने जोरदार  हजेरी लावल्याने यातुन बोंड आळी व रोंगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कापुस  पीकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आसुन या मुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अर्थिक आसमानी नैसर्गीक संकटात सापडला आसुन यातुन बाहेर काढण्यासाठी एकरी 25000 हजार रुपयाची नुकसान भरपाई देउन शेतक-याना दिलासा द्यावा या प्रमुख मागणीसह शेतक-यांचे सरसकट पीक कर्ज माफ करावे,कृषी पंप विज बिल माफ करावे,कापसाला प्रती क्विंटल 7000 हजार रु,हमीभाव देण्यात यावा, बोगस बिटी बियाणे विक्रेत्या कंपनीवर कार्यवाही करावी,यंदा पीक उत्पादनात घट झाल्यामुळे आनेवारी कमी दर्शविण्यात यावी,शेती आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी,या मागण्यासह आन्य मागण्यानचे निवेदन आज दि,06 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे तालुका उपाध्यक्ष मनोहर वसमते,विठ्ठल गवळी जिल्हाअध्यक्ष गवळी समाज,हांडे भगवान यानी उपविभागिय अधिकारी बिलोली यांच्यासह तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी याच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.