विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मैदानी खेळास प्राधान्य द्यावे – महासंचालक चंद्रशेखर ओक

0
26

मुंबई : मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात टी.व्ही., मोबाईल, संगणकावर खेळण्यापेक्षा मैदानी खेळास प्राधान्य द्यावे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले.

चेंबूर येथील ओएलपीएस हायस्कूल येथे आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात श्री. ओक बोलत होते. या कार्यक्रमास कुंग-फू खेळाडू सतीश कुमार, फादर पॉल ज्युलियस, मुख्य सिस्टर ऑरेलिया गागा तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मुलांना आनंदी ठेवण्याबरोबरच कलागुणांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देण्याचे कार्य करावे, असे सांगून श्री. ओक म्हणाले, एकता, कटिबद्धता, संवेदना, राष्ट्रप्रेम हे उत्साहाने भरलेले क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल आनंद होत आहे.

यावेळी श्री. ओक यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्‍या सर्वांना शुभेच्छा दिल्या.