बाबरी पाडल्यानेच अडवानींना मिळाला शाप: कन्हैयाकुमार

0
6

मुंबई,दि.09(विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. या देशात फक्त आंबेडकरवादी आणि डावे संघर्ष करीत आहेत. आरएसएस मुर्दाबाद बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत जेएनयूमधील विद्यार्थी नेते कन्हैया कुमारने व्यक्त केले.

कन्हैया म्हणाला, की भारत सिव्हिल वॉरकडे चालला आहे. आरएसएसने गावामध्ये विभाजन केले असून, विभिन्नतेमध्ये एकता आणणे गरजेचे आबे, आज आम्हाला आंबेडकर, गांधी, फुले, सावित्रीबाईंची गरज आहे. सरकारने साडे तीन हजार कोटी जाहिरातींवर खर्च केले आहेत. हे सरकार जाहिरातींच सरकार आहे. कुणालाही नीच बोलणं (मणिशंकर अय्यर) योग्य नाही, पण याला इतकं महत्व देण्यापेक्षा देशासाठी काय केलं हे बोललं पाहिजे, याला उत्तर नाही. गुजरातमध्ये बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, दलित अत्याचार हे गंभीर प्रश्न आहेत. यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, कर्ज वाढले आहे, गरिबी वाढली आहे. सर्व समाज रस्त्यावर आला आहे, मग विकास कुणाचा झाला आहे? गुजरात मॉडेलप्रमाणे देशाचा विकास करणार अस बोललं जातंय पण गुजरातचाच विकास झाला नाही, तर देशाचा काय होणार? मोदी देशाचा बाप तर गांधी कोण? सध्या देशातील वातावरण खराब झाले आहे. आपला गांधी आणि बुद्धांचा देश आहे. मी कुठल्याच पक्षाचा प्रचार करणार नाही. राम आमच्या मनात, मंदिर बनवून तर धर्माचा विकास होत नाही. बाबरी मशीद हे अल्लाच घर, ते तोडलं म्हणून अडवाणी यांना शाप मिळाला आणि ते पंतप्रधान पदापासून दूर राहिले. यांना रामाच्या आधी नथुरामची आठवण येते, अशी टीका कन्हैया कुमारने केली.