वृंदावनमध्ये विषारी धान्य खाल्ल्याने १३ मोरांचा मृत्यू

0
5

वृंदावन,दि.11(वृत्तसंस्था)-वृंदावनमधील गरुड मंदिरात विषारी धान्य खाल्ल्याने रविवारी तेरा मोरांचा मृत्यू झाला. चार मोरांवर अद्याप स्थानिक पशू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोरांच्या धान्यात विष कसे व कोणी मिसळले याचा पोलीस व वन्य अधिकारी तपास करत आहेत.

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मंदिराचे पुजाऱ्यांना १७ मोर तडफडत पडलेले आढळले. या पुजाऱ्यांनी याबाबत तत्काळ वन विभागाला कळविले त्यानंतर वन विभागाचे अधिकारी एम.के. मीना यांनी मोरांना पशू रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच १३ मोरांचा मृत्यू झाला तर चार मोरांवर अद्याप उपचार सुरू आहेत.या मोरांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू विषारी धान्य खाल्ल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. मृत मोरांचे विस्केरा आग्रा येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. असे मीना यांनी सांगितले.