पाच दिवसीय योग विज्ञान शिबीरास प्रतिसाद

0
13
नांदेड ( सय्यद  रियाज ),दि.14ः-बिलोली तालुक्यातील  माचनुर  येथील पंतजली योगपीठ हरिद्वारच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित योग शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.बुधवारपासून पंतजलीचे योगपीठ हरिद्वार प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी पहाटे 5 ते 7 या दोन तासात योगाचे धडे देत आहेत. महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र योगासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.सकाळी पाच वाजता नागनाथ पाटील (तं मुक्ती अध्यक्ष माचनुर ), दिगांबराव पा फडसे (माजी पं समिती सदस्य ), माधवराव हाणमंतराव पाटील (सेवा निवृत्त प्राध्यापक ), शंकरराव परसुरे (माजी पं समिती उपसभापती ) यांच्या उपस्थितीत योग शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.      योगसाधक महिलांचाही मोठा सहभाग असून शिबिर 17 डिसेंबर पर्यंत दररोज चालणार आहे. पहाटे 2 तास वेगवेगळी आसने व योगाचे प्रकार व रात्री 8 ते 10 पर्यंत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून दैनंदिन आहार-विहार पद्धती, घरगुती उपचार पद्धती व इतर प्राचीन उपचार पद्धतीने शरीर निरोगी व स्वस्थ होण्यासंबधीची माहिती प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे देणार आहेत.शिबीरा दरम्यान जनजागरण रॅली, स्वच्छता अभियानाने शिबीराचे सांगता करुन समारोप करणार असे शिबीराचे मुख्य आयोजक नागनाथ पाटील, नाव नोंदणी प्रमुख व समस्त गावकरी मंडळी सांगितले.