जुनी पेंशन मोर्च्यात नायगाव तालुक्यातील संघटना सहभागी

0
14
 नांदेंड,दि.21ः-   १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना बंद करुन डीसीपीएस / एनपीएस ही नवीन पेंशन योजना लागू केली आहे. त्यामुळे जुनी पेंशन योजनाच ठेवावी या मागणीसाठी सोमवार दि १८ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
        जुन्या पेंशन प्रमाणे कर्मचारी मृत, सेवानिवृत्त झाल्यास पेंशनचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यात अर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुनी पेंशन योजना सरसकट चालू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंडण करुन विधानभवनावर महाआक्रोश व मुंडन मोर्चा काढला एकच मिशन – जुनी पेंशन, हा नारा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी मा.खा. नाना पटोले, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे अदी मोर्चाला पाठिंबा जाहीर केले. या मोर्चात नायगाव तालुक्यातील कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात एच.व्ही.मुंडकर, एस.एच.पवार, व्ही.डी.चव्हाण, श्रीमती एम.जी.तरकंटे, श्रीमती  एस.जी.शिरुळे, श्रीमती जे.के.तेलंगे, आर.एच.जेटेवाड बरबडेकर अदी उपस्थित होते.