आंतरशालेय एकल आणि समूह गीत गायन स्पर्धा

0
17
लाखनी,दि.21ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे स्व दुधराम धांडे, स्व सायत्राबाई धांडे, स्व हरिभाजन सारवे, स्व नामा गभणे, स्व सत्तारसेठ आकबानी, स्व तुळसाबाई पोहरकर, स्व मंदाकिनी सहदेव, स्व विनायक महादेवकर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ दि २४ डिसेंबरला दु १२.३० वाजता भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेला मुरमाडी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे व लाखनी नगरपंचायत सदस्य ज्योती निखाडे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच दि २६ डिसेंबर रोज मंगळवारला दुपारी १२.३० वाजता भव्य समूहगाण स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी उदघाटक म्हणून राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संध्या हेमणे आणि भाजपा महामंत्री नीरज मेश्राम उपस्थित राहणार आहे. या दोन्ही स्पर्धांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येणार असून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी २२ डिसेंबर पर्यंत वाचनालयाचे ग्रंथपाल पवन पडोळे यांच्याकडे नाव नोंदवणे असून शाळांतील जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन वाचनालयाचे आयोजक छबिलाल रहांगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर,  सहकार्यवाह गोवर्धन शेंडे, वाल्मिक लांजेवार, ऍड कोमलदादा गभणे, मंगेश काणतोडे यांनी केले आहे.