अटलजींचे जीवन प्रेरणादायी शिशुपाल पटले यांचे प्रतिपादन

0
19

तुमसर,दि.31ः-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन केवळ भाजप कार्यकर्त्यांसाठी नाही तर संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी व्यक्त केले. अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशहित व पक्षहितासाठी खर्ची घातले आहे. पक्षात काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याने अटलजींपासून प्रेरणा घेवून पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे असेही पटले यांनी सांगितले.  सिहोरा भाजप तर्पेâ भारत रत्न अटलजींच्या जन्मदिनानिमित्त २९ डिसेंबर रोजी गुरूदेव मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिशुपाल पटले उपस्थित होते. भाजप तालुका अध्यक्ष राजेश पटले, कृ.उ.बा.स.तुमसरचे माजी सभापती मयुध्वज गौतम, तुमसर पं.स.चे माजी ,सभापती कलामभाई शेख, सिहोरा भाजपचे अध्यक्ष दा.मु.नंदनवार गुरूजी, माजी उपसभापती सुंदरलाल बोरकर. कृ.उ.बा.स.चे संचालक अनिल जिभकाटे आदी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते. तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांचाही जन्मदिवस यावेळी साजरा करण्यात आला. भाजप कार्येकर्ते गजानन निनावे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मतीनभाई शेख, नंदकिशोर टेंभरे, पांडूंरंग पारधी, संजय राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात अनेक युवा कार्येकर्त्यांनी सहभाग घेतला.