एकोडी-पिटेझरी टी पॉर्इंटवर “नागझिरा बंद”चे बॅनर

0
24

गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.३१ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभवात नागझिरा अभयारण्याचा मोलाचा वाटा.परंतु गेल्या काही तीन चार दशकापुर्वी याच नागझिèयाच्या नावाने नक्षल्यांचा एक दलम कार्यरत होता.परंतु मधल्या काळात त्या दलमचे संपुर्ण उच्चाटन करण्यात पोलीसांना यश आले होते.त्यामुळे नागझिरा अभयारण्याचा परिसर हा नक्षलमुक्त परिसर झालेला होता.परंतु अद्यामध्यात नक्षल्यांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याने पुन्हा शांत नागझिèयात नक्षल्यांची वर्दळ सुरु झाल्याची शंका निर्माण झाली आहे.गेल्यावर्षी सुध्दा वनविभागाच्या साहित्याची नासधुस केली होती.त्यातच आज ३१ डिसेंबरला वर्षाच्या शेवटी नक्षल्यांनी साकोलीकडून नागझिराकरीता जाणाèया पिटेझरी मार्गावर लाल सलाम,नागझिरा बंद,”नागझिरा मे आके देखो” असे लिहिलेले फलक लावले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

लाल कपडयावर नागझिरा बंद लिहिलेले बॅनर तुली सुटसच्या लोखंडी खांबाला बांधले असल्याचे आढळून आले.मात्र त्या बॅनरवर कुठल्या दलमने हे बॅनर लावले याचा उल्लेख मात्र स्पष्ट नसल्याने हे बॅनर नक्षल्यांनीच लावले की कुणी खोळसाळ पणा करुन पोलीसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला हे अजून स्पष्ट झालेले नाही.एकोडी आणि पिटेझरीकडे जाणाèया टि पाँईटवर असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.बॅनल लावलेल्या भागाकडे साकोली पोलीसांची व जवानांची कुमक रवाना झाल्याचे वृत्त हाती आले आहे.या बॅनर संदर्भात पोलीस अधिक्षक  विनीता शाहू , साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत दिसले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकले नाही.त्यातच नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा आज गोंदिया जिल्हात दौरा आहे.