मागासवर्गीय विद्यार्थीनींना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वांची- राजकुमार बडोले

0
23

उस्मानाबाद दि.३१ :: वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तुळजापूर व पिंपरी येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री. बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते.यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, देवानंद रोचकरी, ॲड.अनिल काळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (लातूर) एल.आय.वाघमारे,
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मौजे नजिक पिंपरी, ता.मोहोळ येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलांमुलीकरीता बांधण्यात आलेल्या शासकीय शाळेचे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेऴी  कार्यक्रमाला पालकमंत्री विजय देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मोहोळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे-सोनटक्के, सरपंच रामचंद्र हळनूर, नगराध्यक्ष रमेश बारसकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी.एस. कवठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.
यावेळी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण, स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वभिमान सबळीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजूरी आदेश, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे धनादेश,अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप मंत्री श्री.बडोले,राज्यमंत्री श्री.कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमती मते यांनी केले. सूत्रसंचलन श्री.नादरगे यांनी तर आभार बाबासाहेब थोरात यांनी मानले.