कोल्हापूरच्या महापौरांना अखेर अटक

0
8

कोल्हापूर, दि. ५ – लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या माळवींना आजा डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. आज दुपारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल.
एका जागेच्या प्रकरणात तृप्ती माळवी व त्यांचा सहकारी अश्वीन गडकरी लाच घेणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळाले असता, गेल्या आठवड्यात शुक्रवारी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. गडकरी यास अटक झाल्यावर न्यायालयाने जामीनावर सुटका केली. परंतू, गुन्हा दाखल झाला त्यावेळी रात्र असल्याने कायदेशीर बाबींनुसार तृप्ती यांना अटक करता आली नाही. या घटनेनंतर महापौर तृप्ती माळवी यांचा रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. अखेर त्यांना आज जिस्चार्ज दिला व पोलिसांना त्यांना अटक केली