कृषी कर्जवाटपात रायगड राज्यात दुसरा-ड़ाॅ.सुर्यवंशी

0
11

अलिबाग,दि.03 – खरीप आणि रब्बी या दोन्ही कृषी हंगामाकरिता रायगड जिल्ह्यास २१५ कोटी ७६ लाख रुपयांच्या कृषी कर्जवाटपाच्या उद्दिष्टापैकी ३१ डिसेंबर २०१७ अखेर ७४ टक्के म्हणजे १६० कोटी ७३ लाख रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्याने राज्यात कृषी कर्जवाटपाच्या बाबतीत द्वितीय क्रमांक संपादन केला असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी आयोजित ‘सिद्धी २०१७ संकल्प २०१८’ पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यास खरीप हंगामात १८९ कोटी २५ लाख कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १४७ कोटी ८४ लाख ६३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने कृषी कर्जवाटपात १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून उत्तम कामगिरी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९० कोटी ३३ लाखांहून अधिक रकमेचे कर्ज वितरण केले. या वेळी शेतकरीहिताच्या योजना व ग्रामविकासाच्या विविध योजनांमधील कामगिरीची माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे मांडली. तसेच आगामी काळात जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियान, आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी कायापालट अभियान, बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, पर्यटन विकास, तसेच ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान या महत्त्वाच्या उपक्र मांबद्दल माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात ११ हजार ८१५ शेतकºयांना २० कोटी ८८ लाख ३५ हजार ३०९ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. जिल्ह्यात एकूण ९४७ थकबाकीदार शेतकºयांना पाच कोटी ६० लाख २२ हजार ८१६ रु पयांचे कर्ज माफ झाले. तर नियमित कर्ज परतफेड करणाºया १० हजार ८६८ शेतकºयांना १५ कोटी २८ लाख १२ हजार ४९३ प्रोत्साहनपर लाभ देण्यात आल्याचे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना हा लाभ दिला जातो. त्यात १३ हजार ३९५ सभासदांना १ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच प्रशासकीय यंत्रणांचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.