महाराष्ट्र बंद मागे – अॅड. प्रकाश आंबेडकर

0
7

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.03 – भारिप बहुजन महासंघाच्यावतीने पुकारण्यात आलेले महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बंद पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहे.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र बंद शांततेच्या मार्गाने पार पडला. देशातील काही हिंदू संघटनांचा अराजक माजवणे हाच प्रमुख उद्देश आहे असल्याचा आरोप त्यांनी केला. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा खरा अजेंडा जगासमोर आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो असेही त्यांनी स्पष्ट केले. भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनो केली. सरकार यांच्यावर लवकर कारवाई करून त्यांना अटक करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याकुब मेमनचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात अप्रत्यक्ष सहभाग असूनही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. तसाच न्याय भीमा कोरेगाव हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या या दोघांवर लावला पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.