२० फेब्रुवारीपासून वाघ उत्सव

0
17

नागपूर-विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद) आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहकार्याने येत्या २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत केंद्राच्या प्रांगणात तिसरा वाघ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची गट अ आणि ब अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात वर्ग चार, पाच आणि सहाच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार असून, ब गटात वर्ग सात, आठ आणि नऊच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहील. विविध स्पर्धादरम्यान २० फेब्रुवारीला वेशभूषा स्पर्धा तसेच टाकाऊ, कोरडय़ा आणि ताज्या फुलांची मांडणी अशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पध्रेकरिता ५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. या स्पध्रेकरिता नोंदणी १४ फेब्रुवारीपूर्वीच करावी लागणार असून, वेळेवर स्पध्रेत प्रवेश दिल्या जाणार नाही. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धा नि:शुल्क असून, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रत्येक चमुत पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक तसेच चार उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जातील. तसेच प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्यांला व विजेत्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे शहरातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सर्व स्पर्धा दिलेल्या तारखेला सकाळी ११ वाजता सुरु होतील. जंगल आणि निसर्ग या विषयावर या सर्व स्पर्धा आधारलेल्या राहतील. या सर्व स्पर्धा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात घेण्यात येणार आहेत. स्पध्रेकरिता अर्ज वेदच्या www.vedcouncil.org१ॠ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शाळांमधील स्पध्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज आणि शुल्क वेद कौन्सिल, पहिला माळा, गोकुल-गोपाल एन्क्लेव्ह, माटे चौक, गोपालनगर नागपूर येथे सकाळी ११ ते ५.३० या वेळेत जमा करावे. अधिक माहितीसाठी विनिता माथूर, ९८२३३५३५६८, संगीता पारेख ९७३००४९९९६, पल्लवी उपगन्लावार ९८२२९४३४०२, विनिता बाहरी ९४२३६८३५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळवले आहे.