महाराष्ट्र सदनात पुन्हा हुकूमशाही, निवासी व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे आदेश

0
5

नवी दिल्ली – निवासी असलेल्या व्यक्तींनाच महाराष्ट्र सदनात प्रवेश देण्याचे फर्मान निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी सोडल्याने अन्य नागरिकांना प्रवेशद्वारातूनच हाकलले जात आहे.

नव्या महाराष्ट्र सदनाचा येथील उपाहारगृहाचा दिल्लीतील अनेक व्यावसायिक त्यांच्या सोयीसाठी वापर करतात. काही जणांनी नोकरीसाठी, मुलींच्या मुलाखती घेण्यासाठीही या जागेचा वापर केला. सदनातील कर्मचार्‍यांनी या प्रकरणाची तक्रार निवासी आयुक्त आभा शुक्ला यांच्याकडे केली. त्यांनी यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सदनाच्या प्रवेशद्वारावर दोन बंदुकधारी पोलिस ठेवून आगंतुकास प्रवेश देण्यास मज्जाव केला. त्याचा फटका दिल्लीतील मराठी लोकांना बसला आहे. आभा शुक्ला यांच्या फतव्याने पुन्हा नवा वाद उफाळण्याचे चिन्हे आहेत.

संपादकांना अडवले
महाराष्ट्रातीलएक नामवंत संपादक गुरुवारी सदनात आले. तेव्हा त्यांनाही प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. त्यांनी त्यांचे अधिस्वीकृती ओळखपत्र दाखविले. तरीही सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकाराला. शेवटी सदनातील एका अधिकार्‍यास फोन केल्यावर ते अधिकारी स्वत: प्रवेशद्वारावर आले तेव्हा कुठे त्यांना प्रवेश मिळाला आणि कक्ष उपलब्ध करून देण्यात आला.