समर्थ विद्यालय, लाखनीचा ७७ वा स्नेहसंमेलन

0
14
पाणिनी तेलंग यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन
लाखनी,दि.16ः-‘ समर्थ विद्यालयाने ७७ वर्षांपासून शिक्षणाचे कार्य अविरत पणे चालवत आहे. म्हणजे या सूर्याभोवती ७७ वेळा प्रदक्षिणा घातल्या आहेत अनेक अडचणीना मात केली आहे. असेच कार्य पुढेही सुरू राहावे, विद्यार्थांनी सतत प्रत्येक गोष्ट मध्ये विचार करत राहावे. कारण आपला जन्म हा कार्य करण्यासाठी झाला आहे. मनोरा आणि लेझीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीम वर्क कसे असते हे शिकायला मिळते आणि ते या सामाजिक स्नेहसंमेलनातून शिकायला मिळते असे विचार पाणिनी तेलंग यांनी  उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ विद्यालय, लाखनीचा त्रिदिवशीय स्नेहसंमेलन आज उदघाटक राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोयरीचे संचालक डॉ पाणिनी तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आल्हाद भांडारकर होते.प्रमुख अतिथी म्हणून मधुकर लाड, शिवलाल रहांगडाले, बाळासाहेब रणदिवे उपस्थित होते. यावेळी ‘उदय’ या हस्तलिखित अंकाचे प्रकाशन करण्यात आले. उदय हस्तलिखित हे ६७ वे अंक पाणिनी तेलंग यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कथा, कविता आणि चित्रांचे गुंफण या हस्तलिखितात केले आहे याचे संपादन शिवलाल निखाडे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी शौर्य, संस्कृती आणि धौर्य दाखवत मनोरे, लेझीम, योग आणि कराटे यांचे नयनरम्य प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना आणि त्यांना रंग मंच उपलब्ध करून देणे हा स्नेहसंमेलनाचा उद्देश आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात आल्हाद भांडारकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ताराराम हुमे यांनी केले. संचालन अक्षय मासुरकर व आभार संयोजक अभय भदाडे यांनी मानले.