प्रभारी मुख्याध्यापक राऊत यांना हटवा

0
19

२६ जानेवारीला शाळेला कुलुप ठोकण्याचा पालकांचा इशारा

गोरेगाव,दि.१६:- येथील गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांनी पद सांभाळल्यापासुन अनेक शाळांच्या तक्रारी पालकांनी करुन शाळेला कुलुप ठोकलेले आहेत असेच प्रकरण जिल्हावपरिषद शाळा पुरगावचे पुढे आले आहे.    पुरगाव शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणुन के आर राऊत कार्यरत आहेत. यांचा पालकांशी शैक्षणिक कार्यावरुन तंटे निर्मान होत आहेत. पोषण आहार निकूष्ठ दर्जाचे विद्यार्थांना वाटप करतात व पालकांसी हुजत घालुन मी मुख्याध्यापक आहे, माझे काही करु शकत नाही असे उत्तर देत असल्याचे पालक, सरपंच यांनी आरोप करुन  तक्रार गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सभापती दिलीप चौधरी, पंचायत समिती गणखैरा क्षेत्राचे सदस्य पुष्पराज जनबंधु यांना केली.परंतु या तक्रारीकडे अधिकारी , पदाधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने स्मरण पत्र ५ जानेवारीला  पालकांनी दिले. या तक्रारीकडे पुन्हा दुर्लक्ष केल्यास येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शाळेला कुलुप ठोकण्याचा  इशारा एकनाथ ठाकरे, जितेन्द्र  रहांगडाले, किसनलाल ठाकरे, संतोष खिरेकर, नरेन्द्र कटरे, सरपंच अनंत ठाकरे, घनशाम बागडे, कमलेश ठाकुर, निरंजन पटले यांनी दिला आहे.  या संदर्भात गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांनी सांगितले की, पुरगाव शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक के आर राऊत यांच्या कामाची चौकशी शिक्षण विस्तार अधिकारी मांढरे करणार आहेत. पण त्यांचे वडील मरण पावल्याने सुट्टीवर आहेत पालकांच्या मागणीनुसार मुख्याध्यापक के आर राऊत यांना हटविणार असल्याचे आश्वासन दिले.