जिल्ह्यातील ८ शाळांची विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड

0
6
 जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ६० शाळांची निवड
गोंदिया,दि.१९ ः- केंद्र सरकाराने २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियानङ्कअंतर्गत ‘स्वच्छ विद्यालयङ्क पुरस्कार हा उपक्रम हाती घेतला होता. यानुरुप राज्यातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७-१८ या राष्ट्रीय पुरस्काराकरिता नामांकन सादर करण्याचे सूचना करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील ८७ शाळा पुरस्काराच्या निकषाअंतर्गत पात्र ठरल्या होत्या. दरम्यान, ठरलेल्या निकषांतर्गत तालुका व जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी करण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील ८ शाळांची विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ६० शाळांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त आहे.
भारत सरकाराने घोषित केलेल्या राज्यातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७-१८ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील शाळांचे नामांकन करण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. हे पुरस्कार शासकीय, अनुदानित व खाजगी शाळांसाठी असून, राष्ट्रीय पातळीवर १००, राज्य पातळीवर ४० तर जिल्हा पातळीवर ४८ शाळांची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराकरिता ५ क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था, हात धुण्यासाठी व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तवणूक व क्षमता विकास यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलेल्या शाळांची तपासणी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन करणे होते. तसेच व्हॉटसअ‍ॅपही उपलब्ध करुन देण्यात आले होते. या माध्यमातून शाळांची माहिती जिल्ह्यातील शाळांनी दिली. त्या आधारावर गोंदिया जिल्ह्यात शाळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील ६० शाळांची निवड करण्यात आली आहे. तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ८ शाळांची निवड करण्यात आली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात स्वच्छ शाळांच्या यादीत अनेक शाळांचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ८७ शाळा पात्र ठरल्या होत्या. त्या शाळांची तालुकास्तरीय समिती व जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. दरम्यान, विभागस्तरासाठी गोंदिया जिल्ह्यातील ८ शाळांची निवड करण्यात आली आहे. शहरी खाजगी प्रभागातून शहरातील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट सिव्हील लाईन गोंदिया, ग्रामीण खाजगी प्रभागातून डॉ.आर.के. हायस्कूल कन्हेरी, ग्रामीण प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सोनेगाव, शहरी माध्यमिक विभागातून मॅरिटोरियस पब्लिक शाळा तिरोडा, ग्रामीण प्राथमिक शासकीय विभागातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रेहाडी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरलांजी, ग्रामीण माध्यमिक विभागातून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जमाकुडो व श्रीमती सोनियाबाई आश्रमशाळेचा समावेश आहे. विभागीयस्तरावर निवड करण्यात आलेल्या शाळांची राज्यस्तरीय समिती तपासणी करणार आहे.