पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवा पैसे, बचत खात्यापेक्षा मिळेल दुप्पट रिटर्न

0
16

नवी दिल्ली,दि.22(वाणिज्य वृत्त):– सध्याच्या परिस्थितीत 50 हजार ते 1 लाख महिणा असला तरीही अधिक बचत शक्य होत नाही. नोकरी करणारे असे अनेक लोक आहे. ज्यांची महिण्याला 2,3 किंवा 5 हजार रुपयांपर्यंत बचत होते. काही लोक बचतीला बॅंकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवतात. नाहीतर काहीतरी दुसरा पर्याय निवडतात. मात्र, आज तुम्हाला अशी स्किम सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळेल. तोही अधिक सुरक्षित.

खरं तर बचत कमी असली तर अशा जागी गुंतवणूक करु नका जिथे मार्केट धोक्यात आहे. आपल्या बचत खात्याच्या पैशांचा अधिक रिटर्न कसा घेता येईल याची सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी आपण पोस्ट ऑफिसच्या एका छोट्याशा स्किमचा लाभ घेऊ शकतात. जेथे बचत खात्यात पैसे टाकण्याऐवजी आपण त्या पैशांवर चांगला रिटर्न मिळवू शकतात. खास गोष्ट अशी आहे की, या स्किममध्ये आपण 10 रुपये महिणाही गुंतवू शकतात.

या स्किमवर बॅंकापेक्षा जास्त पोस्ट ऑफिस देत आहे व्याज
येथे आपण जाणून घेऊया, स्मॉल सेव्हिंग स्किम म्हणजे रेकरिंग डिपॉजिटबद्दल, तसे अनेक बॅंकामध्ये आरडी स्किम आहे. पण या स्किममध्ये बॅंकाच्या तुलनेत अधिक व्याज मिळत आहे. एसबीआय, ऊने बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, इलाहाबाद बॅंक आणि आंध्रा बॅंक 1 वर्ष ते 5 वर्ष आरडीवर 6.5 % ते 7 % व्याज देत आहे. तेथेच, पोस्ट ऑफिसच्या 1 ते 5 वर्षाच्या आरडी स्किमवर 7.10 %  वर्षाला व्याज देत आहे.

FD बरोबर मिळत आहे व्याज
सुरक्षित गुंतवणूकीसाठी आणखी माध्यम म्हणजे बॅंक एफडी आहे. ज्यामध्ये आपल्याला अधिक इंट्रेस्ट तर मिळतो. पण यासाठी मोठी रक्कम अधिक काळासाठी लॉकलाईन करावी लागते. तेथेच आपण छोट्या रकमेला दर महिण्याला डिपॉजिट करुण एफडी जेवढे व्याज मिळवू शकतात. अशामध्ये बचत खात्यावर दुपटीने व्यज घेण्याची ही सोपी पद्धत आहे रेकरिंग डिपॉजिट.

बचत खात्यापेक्षी किती अंतर येईल

समजा आपण दर महिण्याला बचत खात्यात आणि आरडीमध्ये 1 हजार रुपये जमा केले. तर तुम्हीही जाणून घ्यायचा प्रयत्न कराल की, 1 वर्षानंतर दोन्ही स्किमध्ये मिळणाऱ्या रिटर्नमध्ये किती अंतर असेल.

सेव्हिंग अकाऊंट:-जर सेव्हिंग अकाऊंटमध्ये दर महिण्याला 10 हजार रुपये जमा करत आहात तर एका वर्षामध्ये 1,24,000 रुपये जमा करावे लागेल. तेथेच वर्षाला 3.5 मिळणारे व्याजाच्या हिशोबाने एका वर्षात आपला 1,24,420 रुपये होईल. म्हणजे आपल्याला एका वर्षात 4420 रुपये अतिरिक्त मिळेल.

RD:-दरमहिन्याला 10 हजार रुपये जमा करत असाल. तर वर्षात 1,20,000 रुपये जमा करावे लागेल. तेथेच आपल्याला पोस्ट ऑफिस आरडीवर वर्षाला 7.1 % व्याज देते. ज्या पद्धतीने आपले पैसे एका वर्षात 128520 रुपये होईल. म्हणजे 8520 रुपये अतिरिक्त मिळेल. जर कंम्पाऊन्डिग इन्टरव्हल क्वार्टली आहे तर आपल्याला एका वर्षात 125420 रुपये म्हणजे 5420 रुपये अतिरिक्त मिळेल.

RD चे फायदे

– रेकरिंग डिपॉजिट गुंतवणूक बचतीवर अवंलबून असते. दर महिण्याला एक निश्चित रक्कम यामध्ये गुंतवू शकतात.- RD चे वैशिष्ट्य असे आहे की, यामध्ये नियमित गुंतवणूकीसोबत फिक्स डिपॉजिटचे फायदे मिळतात. व्याज निश्चित होण्याने कमाईची निश्चितता असते. बॅंकाकडून मिळणाऱ्या ऑफर मिळण्याने संतुष्ट असतात. आरडीमध्ये एक खास लक्षासाठी रक्कम जमा केली जाऊ शकते. – आरडी 10 वर्षापर्यंत होऊ शकते. यामध्ये अधिक काळाचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवले जाऊ शकते.

कसे उघडायचे रेकरिंग डिपॉझिट

आरडी अकाऊंट पोस्ट ऑफिस, बॅंक जाऊन किंवा ऑनलाईनही उघडू शकतात. आपण मोबाईल अॅपनेही आरडी उघडू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी ओपन करत आहात तर कॅश आणि चेक देऊनही आरडी ओपन करु शकतात. आपले अकाऊंक एका पोस्ट ऑफिसहून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर होऊ शकते.