संघी टॉपर्स अवार्ड समारोह ४ फेबु्रवारीला

0
21

आमगाव,दि.२४(पराग कटरे): संघी परिवार गोंदियातर्फे प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांना दर वर्षी संघी टॉपर्स अवार्डने गौरविण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती निमित्! ४ फेबु्रवारी रोजी रविवारला श्रद्वेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी संकुल (डि.फार्म कॉलेज परिसर), आमगाव येथे आयोजित करण्याात आले आहे. यावेळी आमगाव तालुक्यातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे.
संघी टॉपर्स अवार्डसाठी श्री लक्ष्मणराव मानकर इंन्सटीट्युट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी दिशा प्रकाश येवले, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड.ची विद्यार्थिनी प्रेमलता रामेश्वर बिसेन, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन डी.एल.एड.ची विद्यार्थिनी पुष्पा सुखचरण येळे, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकचा विद्यार्थी मुकेश रविन्द्र गायधने, श्री लक्ष्मणराव मानकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था चा विद्यार्थी विनोद भाऊलाल चौधरी, आदर्श विद्यालय येथील १२ वी विज्ञानची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे, तसेच आदर्श विद्यालय येथील १० वी विद्यार्थिनी दिशा यादोराव बघेले व भवभुती महाविद्यालयातून बीएससी मधून प्रियंका मंगलqसग परिहार यांचा समावेश आहे.या सर्व विद्याथ्र्यांना ४ फेबु्रवारीला शिक्षण महर्षी श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती सभारंभात संघी टॉपर अवार्ड स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, ५०० रुपये रोख देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भवभुती शिक्षण संस्थेचे सचिव केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, श्री लक्ष्मणराव मानकर इनस्टीट्युट ऑफ फार्मसी आमगावचे प्राचार्य डॉ.डी.के. संघी यांनी केले आहे.