विद्यार्थ्यांनी गणितात करिअर करावे : डाॅ.सायली जोशी

0
19

‘विलिंग्डन’मध्ये राज्यस्तरीय रामानुजन गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

सांगली/आबासो पुकळे,दि.24 :  विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागाकडून आयोजीत केलेली राज्यस्तरीय रामानुजन प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धा-2018 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. थोर भारतीय गणिती श्रीनीवास रामानुजन यांच्या जयंती निमीत्त भारत सरकारने सन-2012 पासून रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.  विलिंग्डन महाविद्यालय गणित विभागाच्या वतीने गत सात वर्षापासून राज्यस्तरीय रामानुजन प्रश्नमंजुषा स्पर्धा व भित्तिपत्रिका प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. “विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागाने सुरू केलेला रामानुजन प्रश्नमंजुषा व भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धेचा उपक्रम चांगला आहे. गणिताची आवड असणा-या विद्यार्थ्यांनी गणित विषयात  करिअर करावे” असे प्रतिपादन एस.बी जी.आय गणित विभागप्रमुख डाॅ.सायली जोशी यांनी केले. त्या स्पर्धेच्या उद्धघाटनप्रसंगी विद्यार्थ्याशी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, गणित विषय ब-याच लोकांना अवघड का वाटतो हे मात्र माहीती नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी गणित विषयात करिअरच्या खूप संधी आहेत. एम.एस्सी नंतर चांगल्या संस्थांमध्ये पात्रता परिक्षा देऊन नामांकित संस्थांमध्ये गणित विषयात संशोधन करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. वेळेला महत्व देऊन मोबाईलचा वापर फक्त चांगल्या कामासाठी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.स्पर्धेचे उद्धघाटन एस.बी.जी.आय च्या गणित विभाग प्रमुख डाॅ.सायली जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेऴी रामानुजन पीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पंडित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सदस्य सागर फडके, आजीव सदस्य आर.जे. पाटील, डाॅ.आर.ए. कुलकर्णी, डाॅ.एन.के.आपटे, उपप्राचार्य डी.एम. मुंदुगणूर, उपप्राचार्य आर. एस.पोंदे उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेत अनुक्रमे : प्रथम क्रमांक – कु.माळी उत्कर्षा संजय( जयसिंगपूर काॅलेज), कु. पाटील श्रध्दा विवेक (के.डब्लू.सी काॅलेज सांगली), जावडेकर ओकांर दिपक (गोगटे जोगळेकर काॅलेज रत्नागिरी).  द्वितीय क्रमांक : कु.कडाळगे आरती परशुराम (डाॅ.घाळी काॅलेज गडहिंग्लज), कु. पाटील अपर्णा कृष्णा (डाॅ.घाळी काॅलेज गडहिंग्लज), जाधव सुजित संजय(बळवंत काॅलेज विटा) तर भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक : कु.जाबुंरे ऋतुजा सुरेश, कु. शेडगे दिव्या नानासाहेब( वाय.सी काॅलेज वारणानगर) द्वितीय क्रमांक : कु. हांडे नेहा विश्वास( के डब्ल्यू सी काॅलेज सांगली)  या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

रामानुजन प्रश्न मंजुषा, भित्तिपत्रिका प्रदर्शन स्पर्धा एकुण तीन सत्रात आयोजीत केली होती. आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रम्हगुप्ता, महाविरा, माधवा या भारतीय गणितज्ञांची  स्पर्धेतील गटांना नावे देऊन त्यांच्या गणितातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. शेवटच्या सत्रात स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गणित अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ. यु.एच.नाईक, प्रा.डाॅ. एम.एस.बापट, प्रा.डाॅ.जी.डी शेळके, प्रा.एस.एम. दिक्षित, प्रा.एम.एम कोरे, प्रा. सौ. एस.ए.विभुते, प्रा. कु. एस एम.जाधव, प्रा. सौ.ए.व्ही. सूर्यवंशी, प्रा. सौ.चेतना मगदूम, प्रा. संतोष बाबर, प्रा.शाहीन बारगीर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी शुभम हुजरे, आबासो पुकळे, रोहित कांबळे, ज्ञानेश्वरी पाटील, पुजा साळोखे, सबिना मुजावर,अजिंक्य कुंभार, शितल राजगोळकर, अभिजित शिंदे, प्रियांका गुजर, अनिल गडदे, योगेश कोकरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.