वक्फ बोर्डाची जमीन मिळवून द्या मुसलमान समाज सरकार चालवायला पैसे देईल – शब्बीर अन्सारी

0
11

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.25 – सच्चर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात औकाफच्या हजारो एकर मालमत्तेवर अनेकांचा कब्जा आहे. जर सरकार ने सदर मालमत्ता वक्फ बोर्डला परत मिळवून दिल्यास मुसलमान समाज सरकार चालवायला पैसे देईल असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी रेहमानी ग्रुप तर्फे आयोजित कार्यक्रमात केले.
अन्सारी म्हणाले की, सच्चर समिती कोणी बनवली तर सरकारने बनवली होती. सच्चर समितीने लिहिले आहे की जर मुसलमान समाजासंदर्भात सरकारला अत्मित्या असेल तर त्यांनी आज पण सदर अहवालात म्हटल्याप्रमाणे मुसलमान, अल्पसंख्यांकांच्या बद्दल विकासाचा विचार करते तर त्यांनी फक्त औकाफची मालमत्ता परत मिळवून दिल्यास मुसलमान समाजास कोणत्या प्रकारचे अनुदान (ग्रॅन्ड) गरज भासणार नाही, उलट सदर समाज शासनास पैसे देईल. तसेच वक्फ बोर्डामधील दुरावस्थाच्या सोयीसुविधा बाबतचे प्रकरण मंत्रालयात अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्र्यांनी त्यास कॅबिनेट मंजुरी दिल्यास नक्कीच विकास होईल असे अन्सारी म्हणाले. यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुसलमान समाजाची जमिन त्यांना परत मिळावी, त्यांचा विकास व्हावा या अनुषंगाने आवश्यक ती आर्थिक तरतूद येत्या अर्थसंकल्पात करून त्यास मंजुरी मिळावी यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा करून न्याय मिळवून देऊ. दरम्यान औकाफच्या 92 हजार एकर जमिन परत मिळविण्यासाठी तेहरीक-ए-औकाफ अशी चळवळ उभी करून प्रयत्नशील असलेले ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचा रेहमानी ग्रुप तर्फे भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तरप्रदेश मधील आमदार दिनेश चौधरी, वक्फ बोर्डाचे सदस्य अॅड. खालिद कुरेशी, आ. आमीन पटेल, आ. वारीस पठाण, धर्मगुरू मौलाना मोईनुद्दीन सय्यद (मोईन मिया), रेहमानी ग्रुप चे पदाधिकारी, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सचिव शाहरुख मुलाणी, सोलापूरचे अध्यक्ष इसाक खडके, औरंगाबादचे अध्यक्ष मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.