बिलोली शहरातील नाल्याला आले तलावाचे स्वरुप

0
20
बिलोली (सय्यद  रियाज),दि.30ः-  बिलोली  शहरातील देशमुख नगर येथील दरगाह समोरील सी.सी रोडला आले गटारीचे स्वरुप  25 वर्ष उलटले तरी देखील  रोड – नाल्या अजुनही झाल्याच नाही .   शहरातील चौपधरी करणामुळे रोड उंच झाल्याने तीथे पाच ते सहा फुट उतार झाली आहे बाजुच्या प्लाप मालकाच्या प्लाटवर ही तलावाचे स्वरुप आल्याने तो भरती टाकुन प्लाट लेवल केले आणी रोड खाली झाली  त्या मुळे चक्क रस्त्यावरच गटार झाली.  तेथुनच शाळेतील विद्यार्थी  , महिला  नागरीक वाहणांची येजा असते तात्काळ मुरुम टाकुन रस्ता चांगला करणे आवश्यक आहे .   तर काही रस्त्याच्या बाजूला  झाडे झुडपे ही वाढली आहे.   त्याच गल्लीतील नविन मस्जीद  सालेह बिन अली समोरील 100 फुटाचे नाली रोडचे काम मंजूर होऊन देखील गुत्तेदार काम करण्यास टाळा टाळ करत आहे . तीथेही रो तेथेही अश्यास प्रकारचे समस्या आहेत. तर देशमुख नगर परीसरातील नुरुल हुदा मस्जिद समोर ही नाली नसल्याने चक्क तलावाचे स्वरुप आले आहे. तीथेही घाणीचे स्वरुप  आले आहे .साफसफाईची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. जागोजागी पाणी साचल्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले तर घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आसुन रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. .याच नाल्यात पाणी जमा झाल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली .येथे राहणाऱ्या रहिवाशांना दुर्गंधी सह अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. बिलोली नगर परिषदेचे मुख्यधिकारी देखील जाणीवपुर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांची मात्र कुचंबना होत आहे.  अता नगर परिषद काय निर्णय घेणार देशमुख नगरातील नागरीक महिलाचे लक्ष आहे