प्रलंबित मागण्यासाठी डीएड,बीएड स्टुडंट अशोसीएशनच्या वतीने प्रशासनास निवेदन

0
18
आकाश पडघन
वाशीम: दि-30ः- गेल्या ७ वर्षापासून पदभरतीचे प्रलोभन दाखवून निव्वळ टीईटी आणि अभियोग्यरा चाचणीच्या माध्यमातून गरीब बेरोजगार छात्राध्यापकांकडुन शुल्क स्वरूपात केवळ शासकीय तीजोरी भरणाऱ्या राज्याच्या उदासीन शिक्षण व्यवस्थेला महाभियोग्यता चाचणी नंतर पवित्र पोर्टल च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमधील रीक्त असलेल्या शिक्षकाच्या २३००० जागा तात्काळ भरण्यासंदर्भातची मागणी महाराष्ट्र राज्य डीएड बीएड स्तुडंट अशोसीएशन जिल्हा वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दीलेल्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षण मंत्र्याना करण्यात आली. शिक्षक महाभियोग्यता चाचणी होउन महीनाभराचा कालावधी संपत आला असताना पदभरती संदर्भात “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एका महिन्याच्या आत शिक्षक भरतीची प्रक्रीया करु ” असे राज्याच्या शिक्षण मंत्र्यानी केलेले आवाहन विसरु नये व शिक्षणाचे खाजगीकरण करून १३०० शाळा बंद कर ण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशाही मागण्या जिल्हाधिकारी यांना दीलेल्या निवेदनात छात्राध्यापकानी केल्या. राज्य शासनाने शिक्षक पदभरती च्या रीक्त २३००० जागा भरण्यासाठी विलंब केल्यास अगोदरच बेरोजगारीच्या काळोखात जीवन जगणाऱ्या डीएड बीएड धारकांच्या असंतोषाचा उद्रेक आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येइल असा ईशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान ७ वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलीच  पदभरती झाली नसताना केवळ पटसंख्ये अभावी १४००० शिक्षक अतीरीक्त कसे असा प्रश्न उपस्थित करून शिक्षक पदभरतीत झालेल्या  गैरप्रकाराची चौकशी करून  संबंधितावीरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.  दरम्यान वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी क्रीडा शिक्षकाचे पद ही महाभियोग्यतेतुन केंद्रिय पध्दतीने भरण्यात यावे तसेच शिक्षण सेवकांचा कालावधी ३ वर्षाहुन कमी करून १ वर्षाचा करून शिक्षण सेवकाला ९००० वेतन निश्चित करावे सोबतच ३० टक्के नोकर कपात करण्यात येउ नये अशा स्वरुपाच्या मागन्या डीएड बीएड स्टुडन्ट अशोसीएशन वाशीमच्यावतीने करण्यात आल्या असून छात्राध्यापक व ईतर बेरोजगार स्पर्धा परीक्षा धारकांच्या हितार्थ नोकर भरती संदर्भात उदासीन शासन व्यवस्थेला जाब वीचारण्यासाठी सर्वांनी एकत्र लढण्याचे आवाहन डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनचे वाशीमचे जिल्हाध्यक्ष राम धनगर यांनी केले. दरम्यान स्थानिक स्कायटेक टेली सर्व्हिसेस येथे छात्राध्याप व बेरोजगार स्पर्धा परीक्षा धारकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाअंतर्गत स्टुडन्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष मगर यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मार्गदर्शन करून छात्राध्यापकांशी संवाद साधला. दरम्यान आजच्या बॅटल फॉर सेटल या कार्यक्रमाला असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राम धनगर, वाशीम जिल्ह्याच्या विविध भागातुन आलेले छात्राध्यापक आकाश ढोले,रुपेश गोटे,गजानन गोटे,रामहरी भोयर,भागवत गोटे, गणेश गोटे,विजय शेळके,गणेश गोटे,रवींद्र शिरसाट,किसन काळबाडे,सतीश गोटे ,साधवी काबळे,वनिता वाथे,समीर शेख,उमेश सुरुशे,आमु इढोळे ,शाम इढोळे,मनोज शिदे ,अनिल शिदे,रवी शिदे,अंकुश जाधव,अरुण शेळके ,रवी मोपकर, भागवत सावके,अंकुश जाधव,राजकुमार मुळे,श्याम सावंत,अरवींद जाधव आदी छात्राध्यापकांची उपस्थिती होती.