लोकसंवादच्या कृषीरत्न पुरस्काराने भागवत देवसरकर सन्मानित

0
16

नांदेड,दि.30ः-यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रसारक मंडळ, करकाळा च्यावतीने आयोजित लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये कृषीरत्न पुरस्काराने प्रगतशील शेतकरी तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाध्यक्षा डॉ. वृषाली किन्हाळकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, दिलीप कंदकुर्ते, संजीव कुलकर्णी, हरिहरराव भोसीकर, प्राचार्य स.दि. महाजन, उत्तमराव सूर्यवंशी, स्वागताध्यक्ष गोविंद बिडवई, संयोजक दिगंबर कदम आदींच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
भागवत देवसरकर यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल शेतामध्ये नवनवीन प्रयोग, उपक्रम राबवल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवल्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, शे.रा. पाटील, डॉ. पंजाब चव्हाण, डॉ. गणेश शिंदे, पंडितराव कदम, प्रा. संतोष देवराये, ऍड. बालाजी शिरफुले, ऍड. बालाजी वाघमारे, नानाराव कल्याणकर, उद्धव पा. सूर्यवंशी, विनीत पाटील, चक्रधर पाटील, विवेक सुकणे, परमेश्वर काळे, दीपक पवार आदींनी अभिनंदन केले आहे.