नौदलात झाला ‘करंज’ पाणबुडीचा समावेश

0
14

मुंबई,दि.31(वृत्तसंस्था) – भारतीय नौदलात बुधवारी स्कॉर्पियन क्लास करंज पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा यांची उपस्थिती होती. शत्रूच्या रडारमध्ये ही पाणबुडी दिसणार नाही. शत्रू चकवा देऊन योग्य निशाणा साधण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. यापूर्वी नौदलात कलवरी आणि खांदेरी सबमरीन लाँच करण्यात आली आली आहे.ही पाणबुडी टॉरपिडो आणि अँटी शिप मिसाईलद्वारेही हल्ला करू शकते.जमिनीवरून आणि पाण्यात सत्रूवर हल्ला करू शकते. कोणत्याही प्रकारच्या युद्धात तिचा वापर केला जाऊ शकते. ही वॉरफेयर, अँटी-सबमरीन वॉरफेयर आणि गुप्तचर यंत्रणांसाठी अत्यंत चोखपणे काम करू शकते.

ही पाबुडी देशांतर्गत बनावटीची आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ती तयार करण्यात आली आहे.मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये ती तयार करण्यात आली आहे.तिची लांबी – 67.5 मीटर, ऊंची 12.3 मीटर आणि वजन 1565 टन आहे.