लोकसभा पोटनिवडणूक निकाल : भाजपा पिछाडीवर

0
17

जयपूर,दि.01(वृत्तसंस्था) – राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राजस्थानमध्ये अजमेर आणि अलवर या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीवर असून मंडालगड विधानसभेच्या जागेवर भाजपा आघाडीवर आहे.यावर्षाच्या अखेरीस राजस्थान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठी या निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्यातून जनमताचा कौल दिसणार आहे. सचिन पायलट यांनी या दोन्ही जागांसाठी आक्रमक प्रचार केला होता. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झासी होती. यातील एक जागा तृणमुलने जिंकली असून दुस-या जागेवर तृणमुलने मोठी आघाडी घेतली आहे.