विद्यापीठ प्रतिनीधी निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वर्चस्व

0
12

गोंदिया,दि.2 ः-नागपूर विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी(युआर)करीता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी संघाने वर्चस्व मिळविले आहे.जिल्ह्यातील 11 महाविद्यालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीत 10 ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रतिनिधी विजयी झाले आहेत.त्यामध्ये  एन.एम.डी. महाविद्यालय गोंदियातून आकाश सुरेंद्र नागपुरे,डी.बी.सायन्स महाविद्यालय गोंदियाचा दुर्वेश वामेश्वर टेंभरे,एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदियाची कु.वेदांगी नेतलाल पतेहै,एम.आय.टी.महाविद्यालय गोंदिया ची कु.सामीया टी. हुसेन,एम.बी.पटेल महाविद्यालय सडकृ/अर्जूनीचा हितेश देवराम कोहळे,सी.जे.पटेल महाविद्यालय तिरोडाची कु.काजल योगराज टेंभरे,एम.बी.पटेल महाविद्यालय देवरीची कु.गुंजन भागेश जैन,एम.बी.पटेल महाविद्यालय सालेकसाची कु.माधुरी उमाशंकर चुटे,भवभुती महाविद्यालय आमगांवची कु.कुमारी मोहन राव व जगत महाविद्यालय गोरेगांव ची कु.अर्चना राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे.या निवडणुकीसाठी राविका अध्यक्ष केतन तुरकर,निशित रहागंडाले,रमन उके,सौरभ गौतम,कान्हा बघेले,योगी येळे प्रफुल ठाकरे,आशिष येरणे,युगेश बिसेन,कमलेश बारेवार,मनोज बनोटे,राहुल गहरवार,जितेंद्र पारधी,पंकज पटले,दिलीप पारधी,अजय हिरापूरे यांनी काम केले.