माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांला काँग्रेस नेत्याची पाहून घेण्याची धमकी

0
14

सडक अर्जुनी,दि.02 -तालुक्यातील आर.टि.आई. कार्यकर्त्यांना माहितीचा अधिकार मागे घ्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणात डुग्गीपार पोलीसांनी आरटीआई कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.
सविस्तर असे कि सडक अर्जुनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते शेषराव गिर्हेपुंजे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता यांना तहसील कार्यालयात लावलेला अर्ज मागे घ्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ अशी धमकी 29 जानेवारी 2018 दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.येथील तहसील कार्यालय परिसरामध्ये स्टॅम्प विक्रेता गीता लांजेवार या नागरिकांकडून अवैध वसुली करीत 97 रुपयाला मिळणारा स्टॅम्पपेपर 110 रुपयाला नागरिकांना विकत असल्याचा व्हीडीओ पुरावा तयार करण्यात आला.त्यानंतर स्टॅम्पपेपरची विक्री किती रुपयाला करता येते यासाठी आरटीआई कार्यकर्ते बबलू मारवाडे यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला होता.त्या अर्जावर काय कारवाई करण्यात आली,याची माहीती घेणअयासाठी त्यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करीत अर्ज लावला.परंतु तो अर्ज मारवाडे यांनी परत घ्यावे अशा धमकीवजा इशाराच शेषराव गिर्हेपुंजे यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डुग्गीपार पोलीसानी तालुक्यातील सौन्दड़ येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष बबलू बाबुराव मारवाडे (वय 31) यांच्या तक्रारीवरुन सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांच्या विरोधात भाद्वीच्या कलम 506 अन्वये गुन्हा नोंदविला आहे .