जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे धरणे ;‘एकच मिशन,जुनी पेन्शन’

0
12
 शेकडो शिक्षकांचा आंदोलनात सहभाग; जिल्हाधिकाºयांना निवेदन
गोंदिया, दि.३:: शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे आद शनिवारी ३ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवून शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन केले.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांसह कर्मचारी यांना १९८२ मधील तरतूदीनुसार जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधीची योजना सुरु आहे; परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व कर्मचारी यांना नवीन परिभाषित अंशदान योजना सुरु आहे. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांनी केला. यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षक संघातर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. मागण्यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेने डीसीपीएस कपातीचा हिशेब सादर केलेला नाही. २००९ पासून ते २०१८ पर्यंत कपातीचा हिशेब सादर करण्यात यावा, २ जानेवारी २००६ ला रुजू झालेल्या कर्मचाºयांना एक वेतनवाढ लागू करण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना वगळून इतर कर्मचाºयांचा शासन डीसीपीएस हिस्सा जमा करत आहे पण शासनाचा निर्णय नसतानासुद्धा जिल्हा परिषद गोंदियामध्ये प्राथमिक शिक्षकांची डीसीपीएस कपात होत आहे, हे अन्यायकारक आहे, ते थांबविण्यात यावे. एप्रिल २०१४ पासून जी.पी.एफ. खाते उदयावत करून जमा पावती देण्यात यावी, पं.स. सडक अर्जुनी येथील अफरातफर करण्यात आलेली जी.पी.एफ. रक्कम शिक्षकांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावी. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना इंधन व भाजीपाला खर्च रक्कम तसेच स्वयंपाकी तार्इंना मानधन त्वरित देण्यात यावे. सर्वच शाळांना डी.एल. नुसार वीज पुरवठा करण्यात यावा, आॅनलाइन कामे पंचायत समिती कार्यालय व बी.आर.सी. कार्यालयामार्फत करण्यात यावी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक रिक्त जागेवर पदावनत करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांना बढती देण्यात यावी, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
 धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे व विभागीय अध्यक्ष नुतन बांगरे यांनी केले. आंदोलनात अनिरुद्ध मेश्राम, यु.पी. पारधी, सुधीर बाजपेई, केदारनाथ गोटेफोडे, नागसेन भालेराव, शंकरलाल नागपूरे, वाय.एस. मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, सुमेधा गजभिये, विजय डोये, विनोद चौधरी, दुर्गाप्रसाद कोकोडे, जी.जी. खराबे, दिनेश बोरकर, नरेंद्र आगासे, गणेश चुटे, वाय.बी. पटले, वितेश खांडेकर, आशिष रामटेके, सचिन राठोड, बी.बी. ठाकरे, वाय.एस. भगत, विनोद लिचडे, ज्ञानेश्वर लांजेवार, तोषीलाल लिल्हारे, रमेश संग्रामे, मयुर राठोड, सुशिल रहांगडाले, अमोल खंडाईत आदी उपस्थित होते.