उत्तम खोब्रागडे यांच्या घरावर उद्या रिपाइंचे निषेध आंदोलन

0
14

मुंबई दि.10 –  सनदी अधिकारी म्हणून आयुष्यभर सत्तेत राहूनही सत्तेची लालसा उत्तम खोब्रागडे यांची कमी झाली नाही.भ्रष्ट्राचाराच्या आरोपातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आधार घेणाऱ्या; स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या उत्तम खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून  आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला आहे. स्वार्थी आणि सत्तापिपासूवृत्तीमुळे   काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या गद्दार उत्तम खोबरागडेंचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे  आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी केला आहे. गद्दार उत्तम खोबरागडेंच्या घरावर उद्या रविवार दि 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता  वर्सोवा येथे रिपाइंच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काकासाहेब खंबाळकर;गौतम सोनवणे;मन्सूर बलोच प्रकाश जाधव श्रीमंत तोरणे आदी करणार आहेत.अशी  अधिकृत माहिती रिपाइंने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.