विदर्भविरोधी भाजपाला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत धडा शिकवा-आ.आशिष देशमुख

0
22
डॉ.आशिष देशमुख यांचा भाजपाला घरचा आहेर, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ गोंदियात
गोंदिया,दि.१०-  विदर्भाच्या अनुशेषाबद्दल अनेक समित्यांनी अहवाल सादर केले पण शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा मी वेगळ्या विदर्भासाठी आधीपासूनच संघर्ष करीत आहेत. येत्या एका वर्षात भाजपा सरकारने वेगळा विदर्भ केला नाही तर, मी राजीनामा देण्यास मागे बघणार नाही. जनतेने विदर्भासाठी गोंदिया-भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महत्वपूर्ण भुमिका पार पाडीत विदर्भविरोधी भाजपाला धडा शिकविण्याची तयारी दाखविण्याचे वेळ आल्याची सांगून भाजपाला काटोल आमदार आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला. ते आज १० फेब्रुवारी रोजी विदर्भ आत्मबळ यात्रेनिमित्त गोंदियात आले असता,पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांचेसोबत छैलबिहारी अग्रवाल, विरेंद्र जायस्वाल,दिलीप डोये उपस्थित होते.
पत्रकारांशी पूढे बोलताना देशमुख म्हणाले, आंध्रप्रदेशमध्ये प्रचंड विरोध असून सुध्दा स्वतंत्र तेलंगना राज्य निर्माण करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव संसदेत आणावा, अशी  रास्त मागणी आमची असून मागील अनेक वर्षापासून त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, ही त्यांची भूमिका असून विदर्भातील विदर्भप्रेमी जनतेने भरघोस समर्थन जाहीर केले आहे. मात्र, राज्य व वेंâद्रातील भाजपा सरकार विदर्भाच्या नावावार मते मागून सत्तेत आली, मात्र, आता विदर्भाच्या प्रश्नांना बगल देत जनतेला धोका देत असल्याचा आरोपही त्यांनी करून भाजपच्या नेतृत्वात एनडीए सरकारने छत्तीसगड, झारखंड व उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली. २०१० मध्ये युवा जागर यात्रा अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी भाजपने आंदोलनसुध्दा केले होते. विदर्भाच्या जनतेची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करेल, असे या पक्षांचे म्हणणे आहे. सर्व रिपब्लीrकन पक्ष, बहुजन समाज पार्टी, आंबेडकरी पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला समर्थन दिले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेतल्या गेले. सरासरी ९५ टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ मतदान केले. यावरून असे लक्षात येते की, सर्वांगीण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. तेलंगानाप्रमाणेच विदर्भ राज्य निर्माण झाल्यास शेतक-यांच्या आत्महत्यांवर अंकुश बसेल. नक्षलवादावर तोडगा निघेल. रोजगाराची समस्या सुटेल. सिंचनाचा प्रश्न सुटेल. वैदर्भीय जनतेचा विकास होईल. ३ वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने वचननाम्यात उल्लेख केला की, ‘सत्तेत आल्यास वेगळे विदर्भ राज्य निर्माण करू’ विदर्भातील जनतेच्या भरोशावर भाजप सत्तेत आली  पण राज्यकत्र्यांना विदर्भ राज्याचा विसर पडल्याचे सांगून गोंदिया  जिल्ह्यात तिरोडा येथे अदानी वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण वाढले आहे, जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. सिंचनाचा मोठा प्रश्न असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात बेरोजगारी ही अत्यंत गंभीर समस्या आहे. एमआयडीसीमधील बरेचसे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उद्योगधंदे नसल्यामुळे युवकांचे रोजगारासाठी इतर प्रदेशात स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. गुन्हेगारी वाढली आहे. विधवा महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. तेव्हा सर्वांचे भले करायचे असेल. तर, वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.
विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख विदर्भातील ६२ मतदारसंघ पालथी घालत आहेत. त्यात प्रथम टप्प्यात, विदर्भातील ११ जिल्ह्यात जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देऊन ते विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी दि. ०७ जानेवारी २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘विदर्भ आत्मबळ यात्रेचेङ्क आयोजन करण्यात आले आहे. वेळापत्रकातील महत्वाचे टप्पे सोबत जोडले आहे. नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील गावे पालथी घालत ही ‘विदर्भ आत्मबळ यात्राङ्क आज भंडारा व त्यानंतर गोंदिया येथे पोहोचली.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटना, युवक संघटना, महिला संघटना, शेतकरी, युवक, डॉक्टर, इंजिनिअर तसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत सर्व प्रतिनिधी व सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व मतभेद विसरून विदर्भाच्या मुद्यावर एकत्र यावे व विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्राङ्क यशस्वी करावी, असे आवाहन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये कस्तुरचंद पार्क नागपूर येथे भव्य ‘युवक व शेतकरी मेळावाङ्कचे आयोजन करण्यात येणार आहे.