तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार

0
8

तुमसर,दि.11 : तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा येथील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार केशवराव पारधी हे होते. प्रमुख अतिथि म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रभारी तुमसर – मोहाडी विधानसभा प्रभारी आशावरी देवतळे, माजी अध्यक्ष मधुकर लिचड़े, माजी न. प. अध्यक्ष बशीर पटेल, सेवादल जिल्हा अध्यक्ष अरविंद कारेमोरे, तालुका तुमसर अध्यक्ष शंकर राऊत, जिल्हा महिला अध्यक्ष सिमा भूरे, आवेश पटेल, जि. प. सदस्य के. के. पंचबुद्धे, के. बी. चौरागड़े, भूषण टेंभुर्णे, विनोद भोयर, आशीष पात्रे, अध्यक्ष नगरपंचायत स्वाती निमजे, सुनील गिरिपुंजे, अशोक बंसोड़, राजेश ठाकुर, स्मिता बोरकर, कुसुम कांबळे, राजेश हटवार, नीरज गौर, शुभान गभणे, कमलाकर निखाड़े, अजय गोव्हरे,नईम शेख, समीर शेख,इत्यादि तुमसर मोहाड़ी तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ता व पदाधिकारी गण उपस्थिति दर्शवली.
मंचावर सत्कारमूर्ती म्हणून माजी खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेम वनवे, रेखाताई वासनिक, नवनिवार्चित सरपंच रामप्रसाद कहालकर, विनोद मते व उर्मिला कानपटे, ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी प्रतनिधींचा सत्कार करण्यात आला.