अनुदानास पात्र कॉलेजची यादी पंधरा दिवसांत,शिक्षणमंत्र्याचे विज्युक्टा व महासंघाला आश्वासन

0
9

गोंदिया,दि.१२ः-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन अर्थात विज्युक्टाने विविध प्रलंबित व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध पातळीवर केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येत्या १५ दिवसांत अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करण्याचे लेखी पत्र संघटनेला दिले. त्यामुळे २ फेबु्रवारी रोजी राज्यभरात कनिष्ठ प्राध्यापकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात केलेल्या जेलभरो आंदोलनाची ही फलश्रुती मानल्या जात आहे.
विज्युक्टा व महासंघ मागील वर्षभरात विविध पातळीवर आंदोलन करुन आपल्या प्रलंबित व न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. २ फेबु्रवारी रोजी संपूर्ण राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर कनिष्ठ प्राध्यापकांनी जेलभरो आंदोलन छेडले होते. मुंबई येथे मंत्रालयात महासंघ व विज्युक्टा पदाधिकाèयांची तातडीची बैठक ३ फेबु्रवारीला बोलावून चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव प्रा. डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. संजय शिंदे, प्रा. अविनाश तळेकर, प्रा. जाधव, प्रा. जांभरुणकर, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षण संचालक, शिक्षण उपसचिव, उपसंचालक आदींच्या उपस्थिती होती.
पायाभूत सुविधांचा आदेश निर्गमित विमुक्त दिनांकापासून शिक्षकांना मान्यतेचे आदेश, संच मान्यतेविषयी निकष पूर्वीप्रमाणे व विभागावर मान्यता २३ ऑक्टोबर २०१७ च्या आदेशातील वरिष्ठ व निवड श्रेणी आदेशातील पायाभूत सुविधांसंबंधी आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. १५ मार्चपर्यंत प्रलंबित शालार्थमध्ये नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. विद्यार्थी शिष्यवृती प्रक्रिया ऑफलाईन करण्यात येईल, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव प्रा. डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. रायपूरकर, जिल्हा सचिव प्रा. प्रकाश लामणे आदींनी दिली आहे.