शिक्षक ए.एच.कटरे यांचा सत्कार

0
25

गोरेगाव,दि.१३: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक विकास संस्था गोंदिया व शिक्षण विभाग (माध्यमिा) गोंदिया यांच्याद्वारे जिल्हास्तरीय (सीमपोयम) चर्चासत्रा इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाकरिता आयोजित करण्यात आले होते.या काार्यक्रमात विज्ञान विषयात जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल गोरेगाव येथील पी.डी. रहांगडाले विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक ए.एच.कटरे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम. राजा दयानिधी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी उल्हास नरड,  डायटचे प्राचार्य राजकुमार हिवरे,प्राथ.उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी,  माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, पुंडलिक काथरकर, प्रा.डॉ. राजेंद्र निकोसे, डॉ. दिलीप चौधरी सुचित्रा जाधव उपस्थित होते. ए.एच.कटरे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव अ‍ॅड.टी.बी.कटरे, अध्यक्ष डॉ.टी.पी.येळे, प्राचार्य एच.डी. कावळे व सर्व शिक्षकवृंदांनी केले आहे.